१२ ऑक्टोबर २०१४ रोजी `झपूर्झा भाग १ आणि २` या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्याच ठिकाणी विदेशी शिल्पकार आणि चित्रकार यांचं आयुष्य आणि त्यांच्या कलाकृती यांवर लिहायचं ठरलं आणि आम्ही कामाला लागलो. खरं तर या विषयावर लिहिण्याबद्दल आम्ही २००८ सालीच प्राथमिक चर्चाही केली होती, पण इतर पुस्तकांच्या निर्मितीप्रक्रियेत हा प्रकल्प मागे राहून गेला.या पुस्तकाचं काम हा आमच्यासाठी झपाटून टाकणारा अनुभव होता. याची सुरुवात करतानाच चित्रकार असलेली मैत्रीण डॉ. माधवी मेहेंदळे आणि मित्र मोरे यांची खूपच मोलाची मदत झाली. माधवीनं अनेक शिल्पकार आणि चित्रकार नाव सुचवली. शंकरनं तर पुण्यातलं भांडारकर ग्रंथालय, महाराष्ट्र बँकेचं ग्रंथालय ळक ग्रंथालय, पुणे शासकीय ग्रंथालय इथेपासून अनेक वाचनालयं पालथी घालताना नळता साथ दिली. शंकर हा खूप निरागस, संवेदनशील आणि पुस्तकवेडा तरुण असून तो पास पुण्यातल्या बहुतेक वाचनालयांचा सदस्य आहे, त्यामुळे या पुस्तकासाठी काही नाणात प्राथमिक स्तरावरची माहिती त्याच्या साहाय्यानं मिळवता आली. तसंच पुण्यातल्या मिळून सान्याजणी`च्या संपादक गीताली वि. म., व्यवस्थापक मानसी घाणेकर आणि अक्षरस्पर्श बाचनालयाच्या वंदना बोकील, मेधा फणसळकर आणि सुनिला कुलकर्णी यांनीही वाचनालयातील पुस्तकं उपलब्ध करून देण्यात हसतमुखानं मदत केली.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कॅनव्हास