डॉ. गहिनीनाथ वळेकर हे गेल्या बारा वर्षापासून नाट्यशास्त्र व लोककला या क्षेत्रात अधिव्याख्याता म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद येथील शिवछत्रपती महाविद्यालय येथे कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रातील उच्च अशा एम.डी (नाट्यशास्त्र) तसेच पीएच.डी (नाट्यशास्त्र) ह्या पदव्या परिश्रमपूर्वक व अभ्यासूवृत्तीने पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांत सहभागी होऊन त्यांनी शोध निबंधाचे सादरीकरण केले आहेत. त्यांचे विविध संशोधन लेख राष्ट्रीय स्तरावरील नियतकालीकामधून प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांना भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय नवी दिल्ली तर्फे राष्ट्रीय ज्युनियर फेलोशिप (लोकरंगभूमी क्षेत्र) ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय युवकमहोत्सवात परिक्षक म्हणून कार्य केले आहे. नाट्यशास्त्र व लोककलेत विशेष कार्य केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ, औरंगाबाद आयोजित `यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी पूरस्कार मिळाला आहे. तसेच नटरंग फिल्मस् मुंबई यांच्या कडून `सिनेकलावंत पूरस्कार` मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ व क्रिडा संचालनालयाच्या राज्यस्तरीय महोत्सवात संघप्रमुख म्हणून कार्य केले आहे. विद्यापीठ युवक महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना, युवा महोत्सव समिती प्रमुख म्हणून कार्य केले आहे. डॉ. गहिनीनाथ नारायण वळेकर त्याचबरोबर नाट्यशास्त्र व लोककला क्षेत्रातील डॉ. वळेकर यांचा "लोकशाहीर कै. शाहीर विश्वास सांळूके: जीवन व कार्य" हा ग्रंथ नाट्यशास्त्र व लोककला या क्षेत्रातील वाचक, अभ्यासक व संशोधकांना उपयुक्त ठरेल. त्याच्या पूढील भावी कार्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!!!
- श्री. विश्वभर कुलकर्णी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लोकशाहीर कै. विश्वास साळुंके जीवन व कार्य