वाचकांना सविनय प्रणाम,
आजवर मी नाटके, कथासंग्रह, कादंबऱ्या अशा विषयांवर शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. ती प्रकाशित झाली. आपणाकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मी कादंबऱ्या लेखनात सतत वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. सामाजिक, कौटुंबिक, राजकीय विषयावर आजवर खूप लेखन आपल्या आशीवार्दाने झाले. अगदी पन्नासच्या दरम्यान कादंबन्या झाल्या. हा कथासंग्रह आहे. पोलिसांच्या शौर्यकथा वाचायला सर्वांनाच आवडतात. त्यांचे शौर्य, कल्पकता, धडाडी, शोध घेणारी नजर हे वैशिष्ट्य. या बळावर ते शोध घेत असतात. आरोपी कितीही हुशार असला तरी त्यांच्या पर्यंत जाण्यासाठी अगदी छोट्या पुराव्याचा ते कल्पकतेने वापर करतात. खरेच पोलीस खात्यातील सर्वच घटकांना सलामच करावा असे वाटते.
- जगन्नाथ शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मर्डर