न्युनगंड हा एक माणसिक आजार आहे पण कित्येक लोक त्याला आजार माणायलाच तयार नसतात, याच कारण एखाद्यी अनामिक काळातली घटना असू शकते किंवा तिचा संबंध थेट पूर्व जन्माशी सुद्धा असू शकतो. असो या विषयावर बोलण्या इतका माझा अभ्यास नाही आणि तेव्हढी कुवत सुध्दा नाही. खर म्हणजे मुळात या कथेला माझ्या मते हे नाव अयोग्य वाटत आहे, कारण ही एक मर्डर मिस्ट्री आहे पण मला या कथेसाठी दुसर शिर्षक सुचलच नाही त्यामुळे नाइलाजास्तव न्युनगंड हे शिर्षक द्याव लागल. या शिर्षकाचा या कथेशी एव्हादाच संबंध आहे की या कथेचा नायक या न्युनगंडाने पछाडलेला असतो.
या कथेत मी पोष्टमार्टम विषयी नाविन्यपूर्ण माहिती दिली आहे. साधारण पणे पोष्टमार्टम म्हटल की मृत शरीराची चिरफाड एव्हाढच माहित असते. पण पोष्टमार्टम करतांना डॉक्टर कोणकोणत्या बाबी लक्षात घेतो. मृत व्याक्तिची हत्या केव्हा झालेली आहे याचा अगदी तंतोतंत वेळ कसा निर्धारित केल्या जातो. हे डॉक्टर आणि वकिल यांच्या चर्चेतून सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला विश्वास आहे ही माहिती कित्येकांसाठी नाविण्य पूर्ण असेल,
-बाबा पाटील
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : न्यूनगंड