लेण्यांपर्यंत जाण्यास २८३ पायऱ्या आहेत. सुमारे ३५० वर्षापूर्वी आजच्या सारख्या या पायऱ्या नव्हत्या. थोड्याच पायऱ्या लेण्यांस खेटून उतारावर (लेण्यासेवेस) खोदलेल्या होत्या. पेशवे काळात पेशव्यांनी जुन्नर शहराची फेररचना करून जुन्नर शहराच्या परिसराची शान वाढविली अशी माहिती मिळते. पेशवाईत नाणेघाट व दाऱ्याघाटासह डोंगरी चढावरील वाटेची प्रतिवर्षी डागडुजी होत होती अशी नोंद पेशवे दप्तरी आढळते. महाराष्ट्रातील अनेक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार पेशवे काळात झालेला आहे. लेण्याद्रीच्या गणेश लेणी पर्यंत जाणाऱ्या पायरी मार्गाचे बांधकाम पेशवे कालखंडात झालेले असावे.(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लेण्याद्री