डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’ या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा `मी सरकारी डॉक्टर` या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !
आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.
- विलासराव सासने
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मी सरकारी डॉक्टर