विषय नेहमीचाच माणसांच्या षड्रपु भावनांचा व वृत्तीचा. अनेक मराठी लेखकांनी, व. पु. काळे, प्र. के. अत्रे, पु. ल. नी समाजामधील मानवी स्वभावाचं दर्शन त्यांच्या कथांमधे, कथा संग्रहांमध्ये रंगवले आहेत. ती माणसे सर्व सामान्य मध्यम कुटुंबातील होती. परंतु ह्या कथा संग्रहातील माणसे, आपल्या, सर्वांसारखीच परंतु आरोग्य खात्यातील काम करणारी म्हणून नाव आलं. "रोगी माणसांच्या रोगट कथा".वरील थोर लेखकांनी लिहिलेल्या कथा ह्या विनोदबुद्धी वापरून लिहिलेल्या आहेत, पण ह्यातील कथा, वेगळ्या धाटणीच्या आहेत. जरा हेटाळणी करणाऱ्या आहेत. खरं तर ह्या व्यक्तिरेखांची निर्मिती समाजानेच केली आहे, त्यामुळे हा त्यांचा दोष नसून समाज, लहानपण, बालपण, आजूबाजूची परिस्थिती, पालक, शिक्षक व मिडीया व शेवटी समाजामधील माणसांची राहणीमानाची कल्पना व संस्कृती यांचा परिणाम आहे.त्यामुळे ह्यातील व्यक्तिमत्त्वाचा दोष त्यांचा नसून तो समाजाचा आरसाच आहे. पुस्तकाचा मूळ हेतू अशा प्रवृत्ती उघड्या पाडून लोकांनी विचार करावा व पालकांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना काळजी घ्यावी हा आहे.
- डॉ. कुमार ननावरे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रोगी माणसांच्या रोगट कथा