दामू आण्णाचं कधी असं, तर कधी तसं ! या निवडक सतरा विनोदी कथांमध्ये खुससुशीत लेखनशैलीचा रंजक परिचय आपणांस या पुस्तकातून करून दिलेलाआहे. विशेषता दामू अण्णा निघाला करोडपती व्हायला ? या विनोदी कथेत करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरण्यापूर्वीच ते प्रत्यक्षात कशा प्रकारे भंग पावते. सौभाग्यवती रंगुबाईला झालेली सर्दी त्यात KBC ची लय गर्दी यातून दामू अण्णाकडे व्हॅक्सीनचे प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश नाकारला जातो. तोंडापाशी आलेला घास कसा हिरावून घेतात. त्याप्रमाणे काहीसा अनुभव त्यांना येतो. तसेच सगुणाची सोयरीकया कथेत दामू अण्णा म्हणजे चालते बोलते वधूवर सूचक मंडळ मात्र त्यांच्या विसर भोळेपणामुळे ते चक्क राजाराम नावाच्या तरूणाला ते बायोडाटा दिल्या नंतर दोन वर्षानी ते पण राजारामाचे लग्न झाल्यावर कोणतीच कल्पना न देता थेट सगुणा या मुलीची सोयरीक दाखवायला जातात मग काय ? दामू अण्णा नावाचं आलेले अचानक वादळ थेट राजारामच्या घरात घुसून गोंधळ घालतेय. त्यातून होणारी प्रसंगनिष्ठ विनोदाची निर्मिती ही पोट धरून हसवते.
- प्रा. शरद मनसुख
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दामूअण्णाचं कधी असं तर कधी तसं...