संयुक्त महाराष्ट्राच्या महादिव्यातून मराठी माणसाला जावे लागले. १ मे १९६० रोजी `मराठी` भाषिकांचा मुंबई, विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही मराठी माणसाच्या दृष्टीने प्रेरणादायी घटना आहे. सुरुवातीपासून माझ्याही चिंतनाचा विषय आहे. या दृष्टीने मी नेहमीच वेगवेगळ्या संदर्भात या विषयाच्या अंगाने वाचीत गेलो. मराठी साहित्यात या चळवळीचा शाहिरीच्या अंगाने अभ्यास झालेला आहे. यावर मराठी साहित्यात अनेक स्फूर्तिगीते लिहिली आहेत. या चळवळीने सर्वसामान्य मराठी माणसाने आणि लोक कलाकार शाहिरांनी जशी बाजी मारली, तसेच सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या नेत्यांनी मराठी साहित्यात जी आत्मचरित्रे लिहिली आहेत, त्यात या चळवळीचा क्रांतिकारक इतिहास मांडला आहे. म्हणून या चळवळीचा राजकीय व सामाजिक अंगाने अभ्यास होणे जेवढा आवश्यक आहे, तेवढाच वाङ्मयीन अंगाने अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून प्रस्तुत प्रबंधासाठी मी `संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे एक अभ्यास` असा विषय निवडला आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे: एक अभ्यास