यमदूत चालले संपावर या कथासंग्रहातील काही कथा या सकाळच्या गुदगुल्या आणि मुक्तपीठ पुरवणीत प्रसिद्ध झाल्या आहेत. कथांची मुख्यतः दोन भागात विभागणी करता येईल.. पहिला प्रकार म्हणजे काल्पनिक विनोदी कथा आणि दुसरा प्रकार म्हणजे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या विनोदी सत्यकथा. अर्थात दोन्ही प्रकार दिलीप कचेरे यांनी अतिशय समर्थपणे हाताळले आहेत. फँटसी या बिनोदी प्रकाराचीही कचेरे सर यांनी उत्तम हाताळणी केली आहे, हे विशेष नमूद केले पाहिजे. अस्सल वातावरणनिर्मिती, फँटसींचा वापर करीत साधलेली बिनोदनिर्मिती, खटकेबाज संबाद, ठसकेबाज पात्रे, नाटयपूर्ण घडामोडी, सामाजिक संदेश पोचवण्याचा प्रयत्न, वास्तववादी कथांमधील निरागसता आणि धक्कातंत्राचा वापर करीत साधलेला शेवट हे कचेरे सर यांच्या ह्या कथासंग्रहाची ही काही वैशिष्ट्ये सांगता येतील. या कथा वाचताना ती घटना आपल्यासमोर घडत आहेत आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत, इतका जिवंतपणा त्यांच्या लेखणीतून उतरला आहे. एवढे नक्की !
- सु. ल. खुटवड
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : यमदूत चालले संपावर