शास्त्रीय निकषावर मानवाच्या इतिहासाच्या प्रागैतिहासिक काल, इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल अशा प्रमुख अवस्था मानल्या जातात. या प्रत्येक अवस्थेत मानवाने रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल केली. म्हणूनच `इतिहास म्हणजे मानवी प्रगतीचा आलेख` असे म्हटले जाते. मानवी वाटचालीच्या या इतिहासातील क्रिया-प्रकियांची साखळी सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास घडवत असते. इतिहास शिकताना तो साकल्याने समजण्यासाठी ही क्रिया प्रक्रियांची साखळी समजली तर इतिहासाचा अभ्यास आपल्या वर्तमान जीवनाचा सांधा भूतकाळाशी जोडणारा ठरतो. या दृष्टीने `प्रारंभिक भारताचा इतिहास` महत्त्वपूर्ण आहे. आजचा भारत आणि भारताची सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक स्थिती समजून घेण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
1 REVIEWS FOR Book Name : prarambhik bharat pragotihasik kaal te rashtrakut kaal