Book Name | नवभारत |
---|---|
Author | प्रमुख संपादक: राजा दीक्षित |
Publish Date | 07:34 pm, 21-Sep 21 |
Category | Social |
गोविंदभट पारायणातून सनातन धर्माची चर्चा करीत होते. तेव्हाच मामलेदार जॉर्ज थॉमस देवगडात लवाजम्यासह डेरेदाखल झाला. जमावबंदीच्या आदेशासह गोविंदभटाच्या आसनाजवळ गेला. गोविंदभट रामायणातून प्रभुरामचंद्राच्या रूपाने राज्य करत होते. मामलेदार मंदिरात बूट घालून आला आणि रामायणाची कथा मागे पडली. महिपतराव लोकांसमोर येऊन आपण इंग्रजी राजवटीचा भाग झालो आहोत हे सांगताच गोविंदभटाच्या पारायणात खळबळ माजली. रामाच्या दरबारात एक तपस्वी ब्राह्मण हातात लहान मुलाच्या प्रेतासह आक्रोश करीत आला. माझ्या मुलाला जिवंत कर नाहीतर मी प्राणत्याग करीन. तुला ब्राह्मण हत्येचं पाप लागेल म्हणून आर्जवे करू लागला. या पोथीला महिपतराव बसला होता. गोविंदभट राजधर्माचं वर्णन करीत होते. त्यात रामाने नारदाला पाचारण केले. नारदाने तुझ्या राज्यात शूद्र कठोर तपश्चर्या करीत आहे म्हणून ब्राह्मणाचा मुलगा मेल्याचे सांगितले. रामाने पुष्पक विमानातून तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा शोध घेतला आणि त्याचा शिरच्छेद केला. तेहतीस कोटी देवांनी स्वर्गात जमून रामावर पुष्पवृष्टी केली. ज्याक्षणी शंबुकाचा वध झाला, त्याक्षणी ब्राह्मणाचा मुलगा जिवंत झाला. ही रामराज्याची कीर्ती ऐकून भाविकांनी 'जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. महिपतराव गोविंदभटांना घरी बोलावून निघून गेले आणि गोविंदभटाच्या कानात चित्रविचित्र आवाजाचे काहूर माजले........(संपादकीय)
View & Download