Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of शब्द रुची
Book Name शब्द रुची
Author संपादक: सुदेश हिंगलासपूरकर
Publish Date 07:30 pm, 21-Sep 21
Category Literature
Book Description

कोविड महामारी आणि वारंवार लॉकडाऊन आता अपरिहार्य वाटत आहेत. परिणामी मनावर एक हतबलतेची छाया पसरते. वारंवार येणारे नैराश्य हा आता जगभरातील एक प्रमुख आजार आहे, जगभरात काही कोटी लोक या आजाराने पीडित आहेत. फेब्रुवारीमध्ये जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी कोविड-१९ दरम्यान आत्महत्यांमध्ये वाढ झाल्यानंतर, त्यांच्या मंत्रिमंडळात 'एकाकीपणाचे मंत्री' असे स्वतंत्र खाते तयार केले आणि त्यावर एका मंत्र्याची नेमणूक केली. ब्रिटनमध्ये असे खाते आणि मंत्री यांची २०१८ सालीच नेमणूक झाली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या अहवालात असे दिसून आले आहे, की भारतीय लोकसंख्येच्या ७.५% लोक कोणत्यातरी प्रकारच्या मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. अलीकडेच, बॉलिवूडमधील एक तरुण अभिनेता आणि तेलुगू अभिनेत्रीने त्यांचे आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या अशा दुर्दैवी आणि दुःखद मृत्यूमुळे हा विषय परत ऐरणीवर आलाय.
कोरोनाकाळ आणि त्यावरचे उपाय हा विषय गेले दीड वर्ष वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारे मांडला जातोय. त्यातून अधिकच संभ्रमाची अवस्था सर्वत्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या अंकातील मानसोपचारतज्ज्ञांचे, सपुमपदेशकांचे लेख वाचायला हवे. त्यांनी गेल्या दीड वर्षात उद्भवलेल्या नवीन मानसिक शारीरिक समस्यांवर केलेले समुपदेशन, त्यांचे या काळातील सामाजिक निरीक्षण अत्यंत माहितीपूर्ण आहे. .......(संपादकीय)

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!