Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of संभाषित
Book Name संभाषित
Author मुख्य संपादक : डॉ. राजेश खरात
Publish Date 07:38 pm, 08-Jul 21
Category Research
Book Description

लोकांची विचारपद्धती आणि शास्त्रीय ज्ञान यात फरक आहे. शास्त्रीय ज्ञान हे पुरावे, तर्क, कारणमीमांसा, सखोल तपास, सर्वांगीण विचार, सुसंगतता, चिकित्सा, निरीक्षण, पडताळणी, प्रायोगिक तत्त्व यांवर आधारित निष्कर्ष यावर अवलंबून असते. असे शास्त्रीय स्वरूपाचे आणि लोकव्यवहाराचे ज्ञान आकलन करून घेण्यासाठी आणि मानवाच्या एकूणच जीवनविषयक ज्ञानाची वृद्धी करण्यासाठी लेखन साहाय्यभूत ठरते. म्हणून लेखन हे जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक घडणे आवश्यक ठरते.
निरक्षर माणसे साक्षरांकडे मोठ्या आशेने पाहतात. त्यांची अशी एक भावना असते की, आपल्याला जास्त काही कळत नाही, शिक्षित लोकांकडे खूप ज्ञान असते आणि ते जे सांगतील ते खरे असते. यामुळे शिक्षितांवर विशेषतः लेखन करणाऱ्यांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे. की त्यांनी जगापुढे वास्तव मांडावे. मानवतावादी, विज्ञानवादी आणि वास्तववादी विचार मांडावेत. 'नीतीविना मती' ही अनर्थ घडवू शकते. न्यायतत्त्वाची नीती जर विद्वानांच्या अगी नसेल तर अविद्येपेक्षा विद्येनेच जास्त अनर्थ घडू शकता. आज आपल्याला चांगल्या समाजापेक्षा न्याय्य समाजाची जास्त गरज आहे. हे समजून घेण्याची सर्वाधिक निकड आहे…..संपादकीय

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!