Book Name | दिलीपराज वृत्त |
---|---|
Author | संपादक: मधुर बर्वे |
Publish Date | 03:28 pm, 04-Jul 21 |
Category | Research |
'सनातन' ह्या कादंबरीतील काळ अडीचशे पावणेतीनशे वर्षाचा आहे. तर ह्या काळातील महारांचा दिनक्रम आणि जातिव्यवस्थेतील शोषणाचे भयंकर रूप चित्रित करण्याचा हेतू आशयाच्या केंद्रस्थानी आहे. हे चित्रण भीमनाक, सिद्धनाक महार ह्या मुख्य पात्रांचा आधार घेत विस्तारत राहते. समाजशास्त्राच्या अंगाने सांगितलेला इतिहास असेही त्यांचे तंतोतंत नसलेले स्वरूप आहे. कथा- कादंबरी अशा अंगाने जाताना ऐतिहासिक तत्त्वाचा अपमान न करता घ्यायच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा लेखक म्हणून श. लिंबाळे यांनी घेतल्यामुळे, ह्या कादंबरीतील घटना बहूलता इतिहासाच्या सनावळ्यात लुप्त होताना दिसत नाही. त्या दृष्टीने थोडेफार विस्कळीत वाटणारे पहिले प्रकरण पाहता येईल. ह्या प्रकरणातील अनेक प्रसंग त्यांच्या विस्तारासह (होळी, मन्याईची शांती, प्रेतयात्रा, गायीची पड आणतानाचे महार इ.) आल्याने काळाचे भान अधिकच ठळक होताना दिसते. ह्या मुख्य कथानकाबरोबर गोविंदमट, महिपतीराव देशमुख, चेनय्या भिल्ल ह्यांच्या पुढच्या पिढ्यातील अनेक उपकथानके कादंबरीच्या आशयाला प्रवाही तर करतातच, पण काळानुरूप आकार प्रदान करतात....(संपादकीय)
View & Download