Book Name | परिवर्तनाचा वाटसरू |
---|---|
Author | संपादक: अभय कांता, प्रज्ञा दया पवार |
Publish Date | 06:39 pm, 02-Jul 21 |
Category | Social |
जातीचा उल्लेख ही अलीकडे एक स्फोटक बाब बनलेली आहे. तीन वर्षांपूर्वी ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी भारतात एका सभेत स्मॅश ब्रॉनीकल पॅट्रीऑर्की असा फलक उंचावला होता. त्यांच्यावर राजकुमार शर्मा यांनी जोधपूरच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. ब्राह्मण ही एक प्रतिष्ठित जात आहे, असे त्यांनी तक्रारीत लिहिले. अर्थात, सदरील फलकामुळे जातीय अथवा धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, असे न्यायालयाने सांगितले, हा भाग निराळा !
वस्तुतः, पौरोहित्यात फारशी सांस्कृतिक सत्ता राहिलेली नसण्याच्या काळात ब्राह्मणेतरांना व स्त्रियांना पौरोहित्य शिकविण्याची मोहीम संस्कृतीवाद्यांनी घेतली होती. तथापि, ही मोहीम प्रतीकात्मक स्तरावरच राहिली. मंदिरे, सण, व्रत, उत्सव, पारायणे, किर्तने, प्रवचने, पूजाअर्चा यांतून जातधार्मिक व्यवस्थेच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पूर्वअटींचे पुनरुत्पादन शक्य असल्याने या सांस्कृतिक क्षेत्राचे मोल हा वर्ग जाणून आहे. त्यामुळे पौरोहित्याचे क्षेत्र बिनदिक्कतपणे इतरांना खुले करण्यातही या वर्गाला स्वारस्य नाही. प्रभुत्वासाठी आता या वर्गाने राज्यसंस्थेला वेठीस धरले आहे. भारतीय राज्यसंस्था या वर्गाच्या बाजूने किती झुकेल, यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे.….. (संपादकीय)