Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of शिक्षक संघटक
Book Name शिक्षक संघटक
Author संपादक: प्रकाश मा. पवार
Publish Date 06:05 pm, 30-Jun 21
Category Social
Book Description

सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. राज्य सरकारने मराठा समाजासाठी देवू केलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल ठरवले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये वैफल्य आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. तर मागासवर्गीय पदोन्नतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच महाराष्ट्र सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज, इतर मागासवर्गीय समाज व अनूसुचित जाती-जमाती प्रवर्ग या सर्वामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मराठा समाजाच्या न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नापसंती दिसते. या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा. केंद्राने यात हस्तक्षेप करावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळ प्रधानमंत्र्यांना नुकतेच भेटले. ओबीसी आरक्षणावर कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत. केवळ आपलं नेतृत्व ओबीसी समुहातून पुढे आल्याने ओबीसी आरक्षणाशिवाय पुढच्या निवडणूका होणार नाहीत अशी फक्त ओबीसी नेत्यांकडून स्टेटमेंन्ट्स दिली जातात. पदोन्नतीतील आरक्षणावर मागास समाजातील डॉ. नितिन राऊत यांच्या व्यतिरिक्त मोठा कोणताच यावर आक्रमकपणे बोलताना दिसत नाही. पण राज्यातील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येवून त्याविरुद्ध लढा उभा करीत आहेत. हे वास्तव सध्या महाराष्ट्रातीस सामाजिक जीवनात दिसत आहे..….. (संपादकीय)

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!