Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of परिवर्तनाचा वाटसरू
Book Name परिवर्तनाचा वाटसरू
Author संपादक: अभय कांता
Publish Date 11:42 pm, 16-Jun 21
Category Social
Book Description

सध्या चालू असणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाच्या आणखी एका आयामाचा विचार, केवळ आपली संख्यात्मक ताकद बघता करणे, अपरिहार्य आहे. ऑनलाईन अध्यापनासाठी सर्वत्र गुगल किंवा झूमसारखी तंत्रपीठे सरकारी पातळीपासून सगळीकडे सर्रास वापरली जात असताना, त्यातून आपल्या शिक्षणाच्या सवयींचा मोठा डेटा नफाखोर कंपन्यांना नव्या उद्योगप्रारूपासाठी कसा सहज मिळतो आहे, याविषयी आपण अजिबात विचार करत नाही. उपलब्ध दस्तावेजानुसार (२०१४ मध्ये यु. एस. आर्मी रिसर्च लॅबच्या) ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून वर्तननियंत्रण करण्याचा जो अजेंडा २०१० पासून कार्यरत आहे, त्याविषयी सार्वत्रिक जागरुकता असणं गरजेचं आहे.
आठवीपर्यंत शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार असणाऱ्या आपल्या देशात शिक्षण ही अत्यावश्यक, जीवनावश्यक गोष्ट मानली जात नाही आणि त्याला तितके महत्त्व दिले जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सर्व सुरळीत आहे असं दाखवण्याच्या नादात शिक्षणाचा विचार अजूनही वर्गीय पद्धतीने होतो आहे. शिक्षणप्रक्रिया अर्थपूर्ण करताना भारतात अडचणींचीही विविधता असते, याचं भान विसरून कसे चालेल? म्हणून, ऑनलाईन शिक्षणाचे सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, कोव्हिड संसर्गाच्या दृष्टीने ऑफलाईन शिक्षणाची व्यवस्था सुरक्षित वातावरणात आणि समानतेचं तत्त्व पाळत लवकर कशी सुरू होईल, याकडे अधिक लक्ष पुरवलं पाहिजे….. (संपादकीय)

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!