Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of मुक्त शब्द
Book Name मुक्त शब्द
Author संपादक: यशोधन (येशू) पाटील
Publish Date 03:13 pm, 07-Jun 21
Category Social
Book Description

साहित्याच्या क्षेत्रात लिहिण्याने आणि वाचण्याने प्रवेश केला की दोन्ही प्रक्रियांचा अर्थ आणि त्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. एरव्ही लिहिणे म्हणजे दैनंदिन व्यवहारातील लौकिक व व्यावहारिक पातळीवरील जगण्याचा एक भाग असतो. ती काही सर्जनशील व सौंदर्यात्म कृती असते असे लोक म्हणत नाहीत. हे लिहिणे वाचताना विशेष अडचणी येत नाहीत. सतत नव्याने फुटणाऱ्या अर्थांच्या धुमाऱ्यांचे माग वाचताना काढावे लागत नाहीत. अर्थनिर्णयनाचा व्यवहार फार गुंतागुंतीचा असत नाही. मात्र संप्रेषणाच्या हेतूने इथला संदेश तिथे पोहोचवण्याचे गद्य काम करणाऱ्या लिहिण्यावाचण्याच्या प्रक्रियांना साहित्यात्म-सौंदर्यात्म परिमाण लाभताच त्यांचे स्वरूप एकदम बदलून जाते. लिहिण्यावाचण्याच्या प्रक्रियांनी आपला जुनापुराणा वेष त्यागून नवी आणि झुळझुळीत वस्त्रे परिधान केल्यासारखे वाटू लागते. साध्यासुध्या माणसाने वेषांतर केल्यामुळे तो राजपुरुषासारखा दिसावा तसे होते.
लिहिण्यावाचण्याच्या प्रक्रियांमध्ये होणाच्या या परिवर्तनामुळे एका वेगळ्याच क्षेत्रातल्या संकल्पनेची आठवण येते. ही संकल्पना क्रयवस्तूचे दैवतस्वरूप अशी आहे. मार्क्सने कॅपिटलच्या पहिल्या खंडात क्रयवस्तू निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करताना ही संकल्पना वापरली आहे. क्रयवस्तूही लिहिण्यावाचण्यासारखी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जाते. तिथेही वेषांतराचे सूत्र दिसते. क्रयवस्तूलाही नवी परिमाणे प्राप्त होतात. ती समजून घेताना काही गोष्टी दडपल्या जातात. या गोष्टी घडल्यामुळे वस्तुस्थिती दडवली जाते आणि समाजाच्या आकलनामध्ये क्रयवस्तू नवा आणि आभासी, जणू दैवीच असावा असा पेहेराव करून झगमगून उठते......(हरीश्चंद्र थोरात)

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!