Welcome to Pustakmarket !
Home

Magazines Detail

Details of मुक्त शब्द
Book Name मुक्त शब्द
Author संपादक: यशोधन (येशू) पाटील
Publish Date 10:59 pm, 20-May 21
Category Social
Book Description

कोरोनाच्या तांडवात कोणतीच भाषा उपलब्ध नाही. गेली काही वर्षे आपण अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होतो, आता ते प्रश्न सामान्य माणसाच्या भयभीत आकांतामध्ये बुडत चालले आहेत. काही प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत असे म्हणून निरीश्वरवादी जीवनदृष्टी तिची जबाबदारी माणसावर टाकत होती; चिंता आणि विषण्णता यांनी काजळून जात असली तरी. पण माणसांनीच माणसांच्या तोंडावर थोपलेल्या उत्तरांना प्रश्न विचारता येत नाहीत ही परिस्थिती कोरोनाइतकीच भीषण. माणूसपणाची प्रतिष्ठा पणाला लावणारी. भावनिक ओसाडीची चिंता श्रद्धेच्या संस्कृतिव्यूहाला नेहमीच असत आलेली आहे. गांधींना एक उच्चविद्याविभूषित स्वतःच्या अंत:करणाच्या निबरतेबद्दल विचारायला आला. प्रिय पत्नी वारली तरी डोळ्यांतून पाणी येत नाही, दुःख होत नाही तर काय करू असे त्याने विचारले तेव्हा गांधींनी त्याला रामनामाचा जप कर एवढेच सांगून निरोप दिला. आज ऑक्सिजनसाठी तडफडणाऱ्या असंख्य माणसांना तोच जप वाचवेल अशी विकट राजकीय संस्कृती महामारीमध्ये समोर यावी यासारखा उपरोध दुसरा नाही. .....(मासिकातून)

View & Download

Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!