Welcome to Pustakmarket !
Home

Details of
स्वप्नपूर्ती

Book Name स्वप्नपूर्ती
Author समीर रामदास
Publish Date 08:29 am, 29-Dec 20
Category Literature
Book Description

वाचकहो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनप्रवासात आपल्याकडे विरंगुळा म्हणून वाचन करण्यासाठी खूपच थोडा वेळ असतो. अशा थोड्यावेळासाठी म्हणून हलका-फुलका कवितासंग्रह देण्याचा प्रयत्न आहे.
प्रेम ही कल्पना अशी आहे की, ती उमजण्यासाठी अनुभवावी लागते. तो एक कैफ आहे, त्याची नशा आहे . त्या कैफाच्या धुंदीतच तो गुणगुणतो.
अशा गुणगुणलेल्या काही गझल-कविता तुमच्यासमोर सादर केल्या आहेत.
कोणतीही कल्पना सादर करताना शब्द अपुरेच पडतात. जे शब्द सुचले, बाहेर पडले, ते कागदावर उमटवले. बरेच काही मनात राहीले. काही विरले व काही संपलेदेखील.
युवा पिढीचा प्रतिसाद मिळेलच याची मला खात्री आहे.
कवितासंग्रह सादर करण्याचा माझा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठा वाटा माझा मित्रवर्ग व कुटुंबियांचा आहे.
कवितेचा नेमका मतितार्थ जाणून त्यावर सुयोग्य कल्पनेचे ‘रेखाचित्र’ काढण्याचे कसब सौ. संगीता टाकळकर मॅडमचे आहे. त्यांचा मी खूप ऋणी आहे.
माझ्या कविता प्रकाशात आणण्यासाठी ‘अक्षरमुद्रा’ च्या श्री व सौ रहाळकर यांनी पुढाकार घेतला आहे. सुबक व सुंदर छपाईमुळे ‘स्वप्नपूर्ती’ कवितासंग्रहाची गोडी वाढली आहे. यात शंका नाही.

पुन्हा एकदा, प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

-समीर रामदास


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!