Welcome to Pustakmarket !
Home

Details of
शेलारवाड्याची बिल्डिंग

Book Name शेलारवाड्याची बिल्डिंग
Author समीर रामदास
Publish Date 08:03 am, 23-Dec 20
Category Literature
Book Description

प्रथम प्रयत्न म्हणून माझ्या 'जिद्द' कथेमधल्या 'रजनी' या नाययकेप्रमाणे मीदेखील
जिद्दीस पेटून उठलो व कथासंग्रह प्रसिद्ध करायचा असे ठरविले.
मनास जे सुचले ते कागदावर उतरवावे वाटले. तसेच लहानपणापासून निबंध
लेखनाची आवड होती, तिचा उपयोग पुढे होत गेला.
सर्व वयोगटाला समोर ठेवून सोप्या भाषेत या कथा लिहिल्या आहेत. सरळमार्गाने
जाणाऱ्या कथा आहेत. त्यांचा शेवट कडू-गोड आठवणीत रूपांतरित केला आहे.
मराठी मायबोलीच्या प्रेमापोटी लिखाणाची कला जतन करावीशी वाटली. आजच्या
पिढीला इंग्रजी शिवाय सुचत नाही. तो बदल आमच्यातही करून घेतला व त्यामुळेच या
भाषेतील शब्दांचा प्रयोग जिथे टाळता येत नाही अशा ठिकाणी केला आहे. (याबद्दल क्षमस्व!
कथेतील गोडी टिकविण्यासाठी तसे करावे लागले.)
प्रवासवर्णनाच्या कथा ह्या फक्त स्थलदर्शन असे भासू नये, त्या जिवंत व्हाव्यात
यासाठी त्यात पात्रांचा उपयोग केला आहे.
-समीर रामदास


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!