Welcome to Pustakmarket !
Home

Details of
मार्क्स-आंबेडकर समन्वयी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार

Book Name मार्क्स-आंबेडकर समन्वयी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार
Author डॉ. संजय पंढरीनाथ गायकवाड
Publish Date 06:14 pm, 10-Dec 20
Category Research
Book Description

ज्ञान आणि शिक्षणाच्या बळावर मनुष्यप्राणी स्वतंत्रपणे विचार करावयास शिकतो, खरे तर ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा पाया आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा समाज फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच निर्माण होईल असा ठाम विश्वास आहे. सामाजिक परिवर्तनावे खरे साधन शिक्षणच आहे. रोजगार आणि श्रमिक यांची स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर जशी आहे त्याहून वेगळी स्थिती भारतातील श्रमिकांची आहे. मार्क्सवादी श्रमिकांच्या पिळवणूकीच्या आधारांची चर्चा करताना भारतीय कामगाराला भेडसवणाऱ्या जातीच्या संदर्भात विचार केला नाही. भारतीय मजूराला जात आहे आणि मार्क्सने क्रांती आणि परिवर्तन केल्याशिवाय कामगारांची स्थिती बदलणार नाही असे तत्वज्ञान मांडले आहे. त्या तत्वज्ञानाला शिक्षणाची साथ मिळाल्याशिवाय समाज व कामगार क्रांती होईल असे गृहित धरता येणार नाही...(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!