Welcome to Pustakmarket !
Home

तळ ढवळताना

Book Name : तळ ढवळताना
Author : लहू कानडे
Publisher : Pustakmarket.com (May २०२१), पाने – 106
ISBN no : 978-93-91250-27-0
Category : Literature
Price: 70.RS
Discount Price : 50 RS

Book Description

मी प्रामुख्याने कार्यकर्ता आहे. सर्वहारा समाजातून मी आलो. खेड्यातच वाढलो अन् घडपडत ग्रामविकासाच्या कामातच अंमलबजावणी अधिकारी म्हणून काम करता आलं. गावपातळीपासून राजधानीच्या ठिकाणापर्यंत साहेब म्हणून सेवा करताना हा रक्तबंध कधीच नजरेआड झाला नाही. याबद्दलही मला मोठं समाधान आहे. या काळात खेड्यांच्या विकासासाठी मी अनेक प्रयोग केले. 'हागदारीमुक्त गाव' हा असाच एक प्रयोग हा शब्दही माझाच. प्रारंभी अनेकांनी नाक मुरडलेला पण नंतर सर्वांनी स्वीकारलेला. खऱ्या अर्थाने ग्रामस्वराज्य प्रस्थापित व्हावं असं वाटत राहिलं. परंतु येथील सरंजामदारी व्यवस्था, जातिग्रस्त मानसिकता आणि अमलबजावणीच्या स्तरावरील अनेक कारणांनी येत असलेलं अपयश या अनुभवांनी मला चिंतन करायला भाग पाडलं. नव्या आर्थिक नीतीच्या परिप्रेक्षात हे चिंतन कविताबद्ध झालंय असं मला वाटतं. असं म्हणतात की जग बदलतंय आणि खेड ग्लोबल होतंय. तथापि समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व नाकारणारी दहशत आज अनेक वर्गांमध्ये उगवलेली दिसते. त्याविरुद्ध आणि भांडवलशाहीने निर्माण केलेल्या शोषित पीडितांवरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध कलावंतांना / प्रतिभावताना उभं राहावच लागेल. हीच समकालीनता आहे असं मी मानतो. त्या दृष्टीने माझी कविता सार्थकी लागावी एवढंच वाटत….. लहू कानडे


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!