Welcome to Pustakmarket !
Home

झोत

Book Name : झोत
Author : प्रा. डॉ. रावसाहेब कसबे
Publisher : MK INFOEDUTECH PVT. LTD,(2021), पाने – 128
ISBN no : 978-81-952567-0-9
Category : Ideological
Price: .RS

Book Description

झोत’ मध्ये संघाच्या प्रमुख शत्रूंची सविस्तर चर्चा आली आहे. त्यात मुसलमान, खिश्चन आणि कम्युनिस्ट यांचा समावेश आहे. कारण या तीनही विचारधारा चातुर्वण्याला विरोध करणाऱ्या आहेत. २००१ च्या मार्च महिन्यात बंगलोर येथे संघाची महत्त्वाची बैठक झाली. तिच्यात संघाने मुसलमानांसाठी एका त्रिसूत्रीची घोषणा केली आहे. त्यात मुस्लिम समाजाने आपल्या काही इस्लामी संकल्पनांची, म्हणजे काफिर आणि जिहादसारख्या संकल्पनांची पुनर्मांडणी करावी, ढोंगी हिंदू पुढाऱ्यांच्या सापळ्यात न अडकता मुस्लिम समाजातील असगर अली इंजिनियर, सिकंदर बख्त आणि मुशीर-उल-हसन यांच्यासारख्या उदारमतवादी आणि पुरोगामी नेतृत्वाचे हात बळकट करावेत आणि काश्मीरसकट जगात कुठेही हिंदुविरोधात जो हिंसाचार होईल त्याचा या समाजाने निषेध करावा असे संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी जाहीर केले आहे. श्री. मा. गो. वैद्य यांनी मुस्लिम समाजाला ज्यांचे हात बळकट करण्याचा सल्ला दिला आहे त्यात असगर अली इंजिनियर यांचे नाव बघून कोणालाही धक्का बसेल. कारण असगर अली इंजिनियर हे एक आजचे भारतातील आघाडीचे मार्क्सवादी विचारवंत आहेत, हे त्यांच्या लिखाणाचा वैद्यांना परिचय नसल्यामुळे माहीत नसावे असे दिसते. त्यामुळे संघविरोधकांच्या यादीत आता धर्मनिरपेक्ष उदारमतवादी हिंदूंचाही समावेश झालेला आहे....(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!