Welcome to Pustakmarket !
Home

Details of
संयुक्त महाराष्ट चळवळ आणि अण्णा भाऊ साठे

Book Name संयुक्त महाराष्ट चळवळ आणि अण्णा भाऊ साठे
Author प्रा.डॉ. शरद गायकवाड
Publish Date 09:37 am, 09-Jun 21
Category Social
Book Description

संयुक्त महाराष्ट चळवळ हा महाराष्ट्राच्या सामाजिक ,राजकीय ,चळवळीतला रोमहर्षक असा लढा ,या लोळलव्याची व्याप्ती आणि विस्तार हा बहुल स्वरूपाचा होता .संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे डावे -समाजवादी पक्ष आणि लालबावटा कलापथकाची कामगिरी संस्मरणीय आहे.आण्णा भाऊंच्या वाग्मयात या चळवळीतील महाराष्ट संकल्पनेचा विलोभनीय असा अविष्कार आहे .कामगारांच्या झुंजार शौर्यगाथा ते खुरप्या दोऱ्याची श्रमणसंस्कृती त्याच्या महाराष्ट संकल्पनेत आहे .त्याची इतिहासपरंपरेकडे पाहण्याची नवी दृष्टी आहे.अठरापगड जातीला बोलवा संयुक्त करण्याला किवा साधुनी मुंबई विशाल असे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि राजकीय प्रतिकाराची भावना त्याच्या शाहिरीत होती .उद्याच्या नवमहाराष्ट्रासाठी आणि लोकशाहिच्या नंदनवनासाठी बोलवा आता सकलांना असे आवाहन त्यामध्ये होते.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे यांच्या कामगिरीचा विस्तृत परामर्श डॉ.शरद गायकवाड यांनी या पुस्तीकाद्वारे घेतला आहे.या चळवळीतील आण्णा भाऊंचा सहभाग आणि त्याच्या काव्यातील एल्संध महाराष्ट स्वप्नाचा गायकवाड यांनी घेलेला प्रतिसाद शोध महत्वपूर्ण आहे .आण्णा भाऊ साठे यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्वाचा पैलू या ग्रंथातून प्रथमताच समोर येतो आहे.त्याच्या अस्वस्थ शाहिरीची प्रेरक आठवण करून देणारे हे कथन कार्यकर्ते -वाचकांना नवी दृष्टी देईल .(पुस्तकातून )


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!