प्रा. डॉ. उत्तम अप्पासाहेब पठारे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख आहेत. तसेच ते महाविद्यालयातील इतिहास संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.
‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंतांचे आर्थिक विचार’ हा त्यांचा एम.फिल व पीएच. डी. संशोधनाचा विषय असून ‘आर्थिक इतिहास’ हे त्यांचे प्रमुख अभ्यास क्षेत्र आहे.
एक कर्तव्यदक्ष व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा परिचय आहेच याचबरोबर इतिहास विषयातील अनेक पैलूंवर त्यांचे संशोधनात्मक लेखन प्रसिद्ध झाले आहे. अनेक रष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांचे पन्नासपेक्षा अधिक संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत, या शिवाय दोन पुस्तकांचे लेखन व तिन महत्वाच्या पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे.
प्रारंभिक भारत : प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ हे संदर्भ पुस्तक इतिहास विषयातील अत्यंत महत्वाच्या विषयावरचे पुस्तक आहे. हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या F.Y.B.A. आणि M.A. तसेच SET, NET, M.P.S.C., U.P.S.C. अशा विविध स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.