Welcome to Pustakmarket !
Home

Details of
आंबेडकर आणि मार्क्स

Book Name आंबेडकर आणि मार्क्स
Author डॉ. रावसाहेब कसबे
Publish Date 06:21 pm, 31-May 21
Category Social
Book Description

डॉ. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्राच्या विचारवंतातील एक प्रमुख नाव १९७८ साली त्याच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या ग्रंथाने विचारी वाचकांना एक नवी दृष्टी दिली आणि झोत मुळे एक वैचारिक वादळ निर्माण झाले.ते अद्यापही शमले नाही.१९९४ साली त्यांनी हिंदू -मुस्लीम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा ग्रंथ हिहून भारतीय राजकारणातील अंत:प्रवाह स्पष्ट करून धार्मिक मुलतत्ववादाचे रूप उघडे केले.१९९६ साली त्यांनी लिहिलेल्या मानव आणि धर्मचिंतन या ग्रंथाने मानवजातीच्या उगमापासून ते राज्यसंस्थेच्या निर्मितीपर्यंतची विकासप्रक्रिया विविध ज्ञानशाखांच्या आधारे समजून सांगितली.
आंबेडकर आणि मार्क्स यांनी १९८५ साली लिहिलेल्या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती आहे.या ग्रंथाला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत १९९० पासून जागतिक राजकारणात होत असलेले झंझावाती बदल ,सोविएत रशियाचे विघटन,समाजवादापुढील आव्हाने आणि जागतिकीकरणाने मानवजातीपुढे उभे राहिलेले प्रश्न यावर महत्वपूर्ण भाष्य केलेले असून एकविसाव्या शतकातील नव्या चिंतनाच्या दिशा सष्ट केल्या आहेत .म्हणून हा ग्रंथ सर्वच प्रागतिक चळवळीतील कार्यकर्त्यांना जसा मार्गदर्शक ठरेल तसाच विचारी वाचकांनाही अंतमुख बनवील याबद्दलची खात्री देणार आहे .(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!