Welcome to Pustakmarket !
Home

Details of
टाचाटिभा

Book Name टाचाटिभा
Author लहू कानडे
Publish Date 04:00 pm, 31-May 21
Category Literature
Book Description

१९८६ साली माझी लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अधिकारी म्हणून निवड झाली. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष उत्तरे देण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली. 'आता मी निघालोय' हे स्वप्न माझ्या भूतकाळासह सोबत घेऊनच मी अधिकारी झालो. ग्रामीण विकासाचे काम करीत असताना जो चांगल्यासोबतच विसंगतीपूर्ण अनुभव आला तो, 'पाऊस बिचारा खोटा' 'विकासाचे मक्तेदार', 'झाडं कुणाची मरत नाहीत', 'आठवण', 'एक मादिगा स्त्री', 'तडजोड', 'पेटत्या पलित्यांचा जुलूस', 'उमजून समजून', 'नाही आले रडे', 'वाढत्या वयाची वाळवी घेऊन', 'आभाळ झालेले झाड', 'पाखरांचे देशांतर', 'छाताड फोडून एखादी कविता' यामध्ये व्यक्त झाला आहे.
'सहवास स्वप्नांचा ढीग', 'राधा', 'झुंबर' मधील अनुभवांचे विश्व वेगळे आहे. तथापि, 'युध्दभूमीच्या कविता', 'दिवस १ ते ६ 'छबिन्यातील सत्यअसत्य' आणि 'टाचाटिभा' या कवितांमधून जगण्याच्या निवांतक्षणी केलेले चिंतन आहे.
अजून तर खूप प्रवास करायचा आहे. 'टाचाटिभा' ही खोल अंतरंगात मुरलेली प्रतिज्ञा आहे. तसे पाहिले तर टाचाटिभा म्हणजे चामड्याला कातड्याचा सळ घालून शिवणे होय. मला ते जोडणे अधिक महत्वाचे वाटते आणि शोषणमुक्त समाजासाठी केवळ ज्या वृत्तीने येथे शोषणास प्रारंभ झाला ती अतिमहत्वाकांक्षा, स्व आणि स्वकीयांच्या पलिकडे पाहू न शकणारी अप्पलपोटी दृष्टी जरी टाकून देता आली तरी रस्ते कितीही असले तरीही चकवा होणार नाही. कारण डोक्यावरील निळे आभाळ स्वच्छ प्रकाश देतच राहील याची मला खात्री आहे….(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!