Welcome to Pustakmarket !
Home

Details of
चिकित्सा रामदास स्वामींची

Book Name चिकित्सा रामदास स्वामींची
Author पार्थ पोळके
Publish Date 02:14 pm, 20-Apr 21
Category Ideological
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

गेली साडेतीनशे वर्षे रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते अशा प्रकारचा अपप्रचार रामदास समर्थक ब्राह्मण विचारवंतांनी आणि लेखकांनी केलेला आहे व याला इतिहासात कोणताही आधार मिळत नाही. रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हा शोध फक्त रामदासभक्त ब्राह्मणांनाच लागलेला आहे. या अनुषंगाने ब्राह्मण लेखक त्यांच्याच बाजूने रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हणत आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या बाजूने रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे कोणीही म्हटलेले नाही. हीच मंडळी रामदासांना गुरु म्हणून शिवाजी महाराजांच्या गळ्यात बांधत आहेत.
केवळ रामदासांचा संबंध शिवाजीमहाराजांबरोबर लावल्यामुळेच रामदास काही अंशाने चर्चेत राहिले आहेत. अन्यथा रामदासांची चर्चा व्हावी अशी कोणतीही गोष्ट रामदासांच्या जवळ नव्हती किंवा रामदासांच्या अंगी तसे गुणही नव्हते. रामदासांनी महाराजांना "महाराष्ट्र धर्म" सांगितला असा खोटा प्रचारही गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रातल्या ब्राह्मण मंडळींनी केलेला आहे. वास्तविक महाराष्ट्र धर्माची मांडणी रामदासांच्या अगोदर तीनशे, साडेतीनशे वर्षे "महिकावतीच्या" बखरीत आलेली आहे. स्वत:ला लेखक, विचारवंत, बुध्दीवान समजणाऱ्या या ब्राह्मण मंडळींनी ही गोष्ट लपवून ठेवावी याचे आश्चर्य वाटते. रामदासांच्या लिखाणाविषयी मी "कारकुनी" हा शब्द वापरला याचीच आत्यंतिक चीड या रामदास भक्त ब्राह्मण मंडळींना आली आहे. ज्या लिखाणाचा समाजाच्या जीवनाशी, सुखदुःखाशी संबंध नाही, ज्याला शेवटच्या माणसाच्या वेदनेची जराही जाणीव नाही. त्या लिखाणाला कारकुनी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ? रामदासांनी लिहिलेल्या दासबोध वगैरे ग्रंथात अनेक भाकीते केलेली आहेत. अनेक उपमा, विशेषणे वापरली आहेत परंतु त्या समाजाच्या वास्तववादी जीवनाविषयी किंवा त्या काळातल्या सामाजिक जीवनाविषयी रामदासांनी गांभीर्यने काही लिहिले अथवा काय केले असे कुठेही दिसत नाही. उलट

ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥
किंवा गुरु आहे निची याती । काही एक काढली मती ॥
क्षुद्र आचार बुडविती। ब्राह्मणाचा ॥
ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्यासा ब्राह्मणाशीच अधिकारू ॥
वर्णांना ब्राह्मणी गुरु :। ऐसे वचन ॥
वर्णांना बुध्दीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥
गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ।॥३१॥

असे भ्रष्ट ब्राह्मणांचे समर्थन करणारे रामदास फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित राहतात. रामदासांच्या लिखाणात ब्राह्मण समर्थनाचे अनेक संदर्भ आलेले आहेत. एकाच जातीची चिंता वाहणारे महान पुरुष राष्ट्रसंत असूच शकत नाही. या विषयीचीच मी भूमिका परिसंवादात मांडली. त्याविषयी कोणत्याही रामदास भक्ताने गांभीर्याने उत्तर दिलेले नाही. टिकेच्या नावाने मला दिलेल्या शिव्यांमध्ये संदर्भहीन भावनिकता, अनैतिहासिक टिका केली होती. या सर्व नोंदी या पुस्तकात आलेल्या आहेत.
याउलट ब्राह्मणेतर मंडळींनी या अनुषंगाने केलेले लिखाण संदर्भासहीत, विषयाला धरुन, तार्किकदृष्ट्या प्रतिवाद करणारे होते. वाईट याचे वाटते की, ज्या ब्राह्मण मंडळींकडे हजारो वर्षांची ज्ञानाची, लिखाणाची परंपरा आहे; त्यांनी आदर असणाऱ्या रामदासांविषयी संदर्भ देऊन माझे म्हणणे खोडून काढले असते तर मला आनंद वाटला असता. आजपर्यंत या ब्राह्मणी विचारवंतांचा इतिहास असाचा संदर्भहीन बडबड करण्याचा, भावनिक गोंधळ घालण्याचा आहे. रामदास भक्तांनी असाच गोंधळ घातलेला आहे. इतिहासाचे कोणतेही पान यांच्या बाजूने 'नीतीची', 'सत्याची' साक्ष देत नाही. लबाडी, खोटेपणा, अतार्किक बडबड हे त्यांच्या इतिहासाची मांडणी करण्याचे साधन आहे ते आजपर्यंत असेच वर्तन करत आलेले आहेत. सत्याअसत्याच्या निकषावर शिकला सवरलेला बहुजन समाज इतिहासाची, साहित्याची ओळ ना ओळ, शब्द ना शब्द तर्कावर घासून पुसून घेत आहे; याची साक्ष वाचकाला या पुस्तकात मिळू शकते. सदर पुस्तकात रामदासांच्या बाजूने आणि विरोधी आलेल्या सर्व प्रतिक्रियांची नोंद या ग्रंथात सादर केलेली आहे. वाचकांनीही ती तपासून घ्यावी.

- पार्थ पोळके


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!