Welcome to Pustakmarket !
Home

Details of
बंडखोरीचे तत्त्वज्ञान

Book Name बंडखोरीचे तत्त्वज्ञान
Author भाषांतरकार: श्री. भि. वि. मराठे
Publish Date 08:54 am, 20-Apr 21
Category GENERAL BOOKS
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

मानवी जीवनमूल्ये जीवनानुभूतीतूनच प्रकट होतात. जीवनाला अर्थ आहे म्हणूनच आपण जगण्याची इच्छा बाळगतो. आपण त्यासाठीच बंड करून उठतो. बंडखोरी मानवी जीवनाचे महत्वपूर्ण अंग आहे. ती जीवन साकार करते. कामूच्या विचारानुसार आमच्या आजच्या काळात बंडखोरीच्या स्वरूपात आमुलाग्र परिवर्तन झाले आहे. बंडखोरीचे समकालीन स्वरूप गुलाम विरूद्ध मालक अथवा गरीब विरुद्ध श्रीमंत असे नसून, परतत्त्वात्मक (Metaphysical) आहे. ही परतत्त्वात्मक बंडखोरी म्हणजे मानवाचे जीवनस्थितीविरुद्ध बंड, प्रत्यक्ष निर्मिती व निर्मात्याविरुद्ध बंड. विश्वाकडून आपल्या वाट्याला वैफल्यच आले आहे, असे परतत्त्ववादी बंडखोर जाहीरपणे प्रकट करतो. जीवन आणि मृत्यू यांच्या यातनांना टक्कर देण्यासाठी जीवनातील विसंगतींविरुद्ध लढ्याची न्याय्य मागणी म्हणजे परतत्त्वात्मक बंडखोरी वाटतो तसा परतत्त्वात्मक बंडखोर निरीश्वरवादी खचितच नसतो. तो देवनिंदक असतो. मृत्यू व भोग यांचे आदिकारण म्हणून तो ईश्वराचा धिक्कार करतो. समकालीन अस्तित्ववाद (Existentialism) हीच बंडखोरी सूचित करतो. मानव म्हणजे निरर्थक वासनांची मूर्ती, जीवन म्हणजे अर्थशून्यता....(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!