Welcome to Pustakmarket !
Home

Details of
कृतार्थ सायंकाळ

Book Name कृतार्थ सायंकाळ
Author डॉ. बी. जी. बंगाळ
Publish Date 07:08 pm, 15-Apr 21
Category Literature
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

कोलंबसने अनेक अडथळे पार करीत खडतर प्रवास करून अमेरिकेला जाण्याची वाट शोधून काढली. त्यावेळी अमेरिकेत मागासलेल्या जमातींचे अस्तित्व होते. इंग्रजांनी मोठ्या चातुर्याने तेथील मागासलेल्या जमातींच्या मदतीने अमेरिकेचे नंदनवन बनवले व जगातील सर्वात संपन्न व प्रबळ राष्ट्राची निर्मिती झाली. याचे श्रेय कोलंबसला जाते यात शंका नाही. तद्वत भाऊने अनेक हालअपेष्टा सोसून, आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देऊन, शिक्षणासंबंधीच्या नवीन वाटेचा शोध लावला. चालूनचालून मळलेल्या वाटेने कोणीही वाटसरु सहजासहजी जाऊ शकतो, परंतु ही वाट ज्याने प्रथम शोधून काढली तो एका अर्थाने युगपुरुष! ती वाट माझ्यासहित आमच्या कुटुंबातील पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरली. त्यामुळेच आज आमच्या कुटुंबातील प्रत्येक जण त्याला हवे ते व हवे तेवढे शिक्षण घेत आहे. शिक्षणाने जीवनात क्रांती होते हा आदर्श भाऊने समाजाला दाखवून दिला. म्हणूनच, बंगाळ घराण्याला नवी दिशा देणारे ते कोलंबस आहेत असेच मी समजतो. या पुस्तकाच्या निमित्ताने भाऊने आयुष्यातले जितके आठवतील तितक्या प्रसंगांचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे. भाऊला पुढेही निरोगी, सुखाचे व समाधानाचे आयुष्य मिळो ही प्रार्थना!....(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!