Welcome to Pustakmarket !
Home

Details of
संघर्ष वाटा

Book Name संघर्ष वाटा
Author डॉ. संजय दामू जाधव
Publish Date 06:03 pm, 19-Mar 21
Category BIOGRAPHY
Book Description

पोट भरायचे आणि कुटुंब चालवायचे तर एकतर व्यवसाय करायला हवा, नाहीतर लवकर नोकरी शोधायला हवी. नोकरीची शोधाशोध सुरु असतांनाच मी मिळेल त्या ठिकाणी हाडांचे पेशंट बघायला जाऊ लागलो. मग ते चंदननगरी, खराडी, वडगावशेरी असो की पिंपरी चिंचवड भागातसुध्दा. आपली फारशी ओळख नाही, आपल्या नावाने पेशंट कसे येणार ? डॉ. गायकवाड यांच्या नावाने ओळख होती, त्याचा मला फायदा झाला.
डॉ. गायकवाड यांना वाटत होते की, मी पुण्यातच रहावे. त्यासाठी त्यांनी त्यांचे एक मित्र आणि तलाठी पोटेसाहेब यांच्याबरोबर येऊन केदारनाथ नर्सिंग होम नावाचा एक भागीदारीतील व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात माझाही समावेश केला. मी कुठलेही भांडवल न देता त्या व्यवसायाचा ३३% भागीदार झालो. डॉ. गायकवाड यांनी रुग्णालय बांधावयास घेतले. पोटे भाऊसाहेब मला सारखे सांगायचे की, तुम्हाला फ्लॅट देतो. तुम्ही विश्रांतवाडीत घर करायचं. त्या ठिकाणी प्रॅक्टीस करायची. पैसे कमवायचे. मग आम्ही तुम्हाला पुढे ५०% भागीदार करु. सगळे मला उपकार व आभासीपण वाटायला लागले होते....(पुस्तकातून)


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!