Welcome to Pustakmarket !
Home

Details of
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय

Book Name लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय
Author संपादक मंडळ: अर्जुन डांगळे, नीला उपाध्ये, वसुंधरा पेंडसे-नाईक, डॉ. सुभाष सावरकर
Publish Date 08:40 pm, 14-Mar 21
Category Ideological
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जगविणारा हा दलित वरवर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हाही पवित्र अशीच असते. कुटुंबसंस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंबसंस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारणपरंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्याविषयी लिहावे. जपून लिहावे; कारण या समाजाची घडीन् घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे." अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!