Welcome to Pustakmarket !
Home

Details of
आई तू होतीस तेव्हा ...

Book Name आई तू होतीस तेव्हा ...
Author प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन
Publish Date 02:43 pm, 05-Mar 21
Category BIOGRAPHY
पूर्ण ई-बुक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Book Description

प्रा. डॉ. शैलेश विश्वनाथ त्रिभुवन यांचा आई तू होतीस तेव्हा हा काव्यसंग्रह त्यांची आई दिवंगत झाल्यानंतर आईच्या स्मृतींचे स्मरण करणारा एक उत्कृष्ट चरित्रकाव्य संग्रह आहे तो निर्माण केल्याबद्दल कवी प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन यांचे अभिनंदन!
या संग्रहातून कष्टाळू, कणखर, प्रेमळ, परोपकारी व संघर्ष करणारी माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांवरही प्रेम करणारी, आणि स्वत: निरक्षर असली, तरी मुलांवर शिक्षणाचे व समतेचे संस्कार करणारी आई आपल्याला भेटते व सहज जाता जाता मानवतेचे तत्त्वज्ञानही आपल्याला या संग्रहातून सांगून जाते. ही आई म्हणजे परकरी पोरगी नदीच्या डोहात मनसोक्त डुंबणारी, हुंदडणारी, लंग्न म्हणजे काय, हे न समजणारी अशी अल्लड तरीही वयाच्या पंधराव्या वर्षी सासरलाच माहेर मानून सर्वांनाच लळा लावते; अन् गरिबीचा संसार अगदी अंतापर्यंत नेटाने करते. आपल्या आई वडिलांची लेक असूनही सासू-सासऱ्यांचीही ती लेक होते. या सर्व कवितांमधून डॉ. शैलेश त्रिभुवन यांनी आईची महती या संग्रहातून शब्दबद्ध केली आहे. या सर्व कविता आईच्या बालपणाच्या, तिच्या आईच्या कष्टा संबंधीच्या, तिच्या वडील प्रेमा संबंधीच्या अन पुढे सासरी निभावलेल्या अनेक भूमिकांच्या श्रमप्रवासा संबंधीच्या तसेच आजारपणातील कष्टाच्या व विशाल मनाच्या, शेवटी तिच्या अनंतात विलीन होण्यासंबंधीच्याही आहेत.
- प्रा. डॉ. नंदा कांबळे


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!