का. दा. नायक हे खरे सत्यशोधक आहेत. कोणताही पूर्वग्रह मनात न धरतां पुढे येतील त्या पुराव्यांची ते छाननी करतात आणि भावनेला न पटणारे सत्यही खुल्या मनाने स्वीकारतात... श्री. नायक यांच्या ठिकाणीं वणिग्वृत्ती व ब्रह्मशक्ती यांचा मनोज्ञ संगम झाला आहे. ते आयुष्यभर वाचनांत, अभ्यासांत रमले, रंगले. पण मी कोणी संशोधक आहे, याची कोणाला जाणीवही त्यांनी होऊ दिली नाही. 'हा अमुका ऐसी नोहावी। सेचि लोकां।।' ही ज्ञानेश्वरांची उक्ति त्यांना नेमस्त लागू पडते. चतुरस्र विद्वान असूनही विद्वत्तेच्या आढ्यतेपासून बारा हात दूर राहणारा हा सात्विक पुरूष आहे." - पं. महादेव शास्त्री जोशी