माणूस जास्तीत जास्ती किती उंच होऊ शकतो ?
आपल्याला किती शब्द अवगत असतात ?
कोणीही किती भाषा शिकू शकतो ?
आपण किती रक्ताचं दान करू शकतो ?
संगीतकला किती जुनी आहे ?
मानवी देहाची किंमत किती आहे ?
अनेक प्रश्न.
आपल्या ओळखीचे आपल्या आसपास घडणारे.
या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे.
तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरे आड केलेले.
पण त्याच निराकरण करण्यासाठी जराशी जरी घडपड केली तरी त्यातून आपल्याला उमगत ते खरं तर ‘क-का-की’ ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृद्ध खजिना
आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेल विज्ञान.
आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरुकिल्ल्याच.
त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता तिळा तिळा दार उघड.
विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोणी. त्यातलाच हा एक,
किती?
बिनधास्त उच्चारा
आणि पहा तुमच्यापुढ कोणता विभ्रमकारी नजराणा सादर होतो ते ! ...(पुस्तकातून)