भक्ती आणि धम्म या ग्रंथाची सुरुवात ईश्वर आणि धर्माच्या उगमापासून होते. त्यासाठी विल्यम जेम्स यांचा The Psychology of Religion आणि युस्टेस हेडन यांचा A Biography of the Gods या ग्रंथांचा फार उपयोग झाला. या ग्रंथात धर्म आणि ईश्वराचा जसा धार्मिक, अध्यात्मिक अंगाने विचार आहे तशीच त्यात ऐतिहासिक दृष्टीही आहे. अर्थात, त्यासाठी भारतीय आणि इतर देशांतील या विषयावरील काही महत्त्वाच्या विचारवंतांच्या ग्रंथांचा आधार घेतला आहे.