Welcome to Pustakmarket !
Home

भारताचे संविधान

Book Name : भारताचे संविधान
Author : लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संपादक- स्मिता प्रभाकर कांबळे
Publisher : नो-लाईस पब्लिकेशन
ISBN no : -
Category : Political
Price: 260.RS
Discount Price : 260 RS

Book description

आज भारताचे संविधान अंगीकारून आम्हा भारतीयांना ६९ वर्षे पूर्ण झालीत. भारतीय संविधान हे एकूण २२ भागांमध्ये विभागले असून त्यात ३९५ अनुच्छेद आणि १२ अनुसूचि आहेत व ह्या कारणास्तव भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. आज पर्यंत भारतीय संविधानात एकूण १०१ संशोधन झाले असून जर सह भाग व अनुच्छेद यांची बेरीज केली गेली तर एकूण २५ भाग आणि अंदाजे ४५९ अनुच्छेद होतात पण अधिकारिकरीत्या भारतीय संविधान हे ३९५ अनुच्छेद आणि १२ अनुसूचि या सह भारताचे एकमात्र राष्ट्रीय ग्रंथ म्हणून देशातील संपूर्ण राज्यव्यवस्था व प्रशासनाची जबाबदारी आपल्या मजबुत खांद्यावर वाहत आहे. भारतीय संविधान मुख्यत्वे स्वतंत्रता, समता, बंधूता व न्याय ह्या महान तत्वांवर आधारित आहे. ही तत्वे बोधीसत्व तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून संविधानात अंतर्भूत केल्याचे बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेला आहे. जर भारतीय संविधानाच्या उद्देशीकेच्या सुरुवातीलाच 'आम्ही भारताची लोक' हे विधान कोरून भारतीय संविधान हे विशिष्ट धर्माला, जातीला, संप्रदायाला किंवा प्रदेशाला अर्पण केले नसून भारताच्या नागरिकांना' अर्पण केलेले आहे हे स्पष्ट होते. भारतीय संविधानाचा मूळ गाभ्यातच समानता नांदत असल्याने, सामजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक समतेचा पुरस्कार, भारतीय संविधान सुनिश्चित करतो. पार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची भारताच्या संविधानाचा जनक व शिल्पकार म्हणून ओळख सर्वव्याप्त आहे. मसोदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीकरीता घेतलेले प्रचंड श्रम आणि त्याग ह्याची तुलना जगाच्या पाठीवर कुठल्याही कार्याशी केली जाऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. भारतीय संविधान निर्माण करून एकप्रकारे संपूर्ण देशात समतेच्या क्रांतीचे बिजारोपण केले हे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. भारतीय संविधानामुळे ह्या देशातील दलित, वंचित, शोषीत बहुल भारतीय समाज खऱ्या अर्थाने आज स्वतंत्र नागरिक म्हणून भारतात अभिमानाने श्वास घेत आहे. एक सच्चे राष्ट्रभक्त म्हणुन जेव्हा बाबासाहेबांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी स्वत:वर व त्यांचा करोडो दलित लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध वचपा काढीत बसण्यापेक्षा स्वतंत्र भारतासाठी एक सार्वभौम संसदीय लोकशाही म्हणजेच अब्राहम लिंकन यांच्या शब्दात लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालणारे व संचालीत होणारे खरे लोकराज्य निर्माण केले. मलाया गया गरी परंतु अत्यंत जड अंत:करणाने येथे नमुद करावेसे वाटते की ज्या भारतीय संविधानाने भारतातल्या समस्त नागरिकांना सर्वोच्च लोकशाहीपर कल्याणकारी राज्य दिले, त्याच भारतीय संविधानाची मूलभूत तत्वे आणि तरतुदी राबविण्याकरिता ह्या देशातील शासन प्रचंड उदासीन दिसून येते. या संदर्भात बाबासाहेबांनी संविधान सभेतील आपले शेवटच भाषण दि २५.११.१९४९ रोजी चिंता व्यक्त केली होती.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!