-'राजा शिवछत्रपती' ह्या मालिकेनं मराठी मालिकांच्या इतिहासात स्वतःचं गौरवपूर्ण स्थान निमार्ण केलं आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली ती डॉ. अमोल रामसिंग कोल्हे या तरुण कलाकारानं. ही भूमिका करत असताना डॉ. अमोल कोल्हे यांनी कशी कठोर मेहनत घेतली, काय काय केलं याचा लेखाजोखा मांडणारं 'शिवगंध' हे एक स्मरणरंजन आहे. एखाद्या मालिकेवर, त्या मालिकेतील भूमिकेवर आधारलेलं हे मराठीतील पहिलं पुस्तक आहे.
(पुस्तकातून)