Welcome to Pustakmarket !
Home

अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद

Book Name : अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद
Author : उत्तम कांबळे
Publisher : लोकवाङ्मय गृह, २०२०, पाने- २४२
ISBN no : 978-93-82906-79-7
Category : Ideological
Price: 350.RS
Discount Price : 315 RS

Book description

माझ्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून झाल्यावर मला प्रश्न पडला, की मी हे सारं लिहिता का झालो? माणगाव इथं भरलेली दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद शंभरीची झाली हे एक कारण होतं पण त्यापेक्षा आणखी काही वेगळं होतं. ते वेगळं काय होतं हेही आठवायला लागलो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या तीन महापुरुषांच्या म्हणजेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवमुक्तीसाठी ज्या लढाया केल्या त्या वर्षानुवर्षं असंख्य गुलामांना मुक्त करत राहिल्या आहेत. अजूनही करताहेत. त्यांनी रोवलेले मैलाचे दगड पाहत कोट्यवधी लोकांचा प्रवास सुरू आहे. प्रवास करणाऱ्यांसाठी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली प्रबोधनाची, संघर्षाची झाडं अजूनही कोट्यवधी लोकांना सावल्या देत आहेत. हे महापुरुष आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांचा जागर रोज कोट्यवधी लोकांच्या काळजात येतो. त्यांना तो जागे करतो. या सर्व कोट्यवधींमध्ये मीही एक आहे, असं मला वाटत आलंय. हे सारं मला कधी व्यक्त करता येत नव्हतं. त्यासाठी जाणीवपूर्वक कधी ठोस प्रयत्न केला नव्हता. माणगाव परिषदेच्या शंभरीनं मला ही संधी दिली. गेली चाळीस वर्षं तरी माणगाव परिषद आठवली नाही असं कधी घडलं नाही. अस्पृश्यतेतून मुक्त होण्यासाठी लढाईचं पहिलं मैदान तयार झालं ते माणगावात. समाज बदलासाठीच्या युद्धासाठी पहिला बिगुल वाजला तो माणगावात. अस्पृश्यांना नवा, तडफदार, संघर्षशील, त्यागी, ज्ञानी नेता लाभला तो माणगावातच. युद्ध मैदानावर या महानेत्याचं पहिलं भरभक्कम पाऊल पडलं ते माणगावच्या परिषदेतच. जगभर जसं गुलाममुक्तीच्या, मानवमुक्तीच्या तसंच काहीसं इथल्या गुलामांच्या मुक्ततेसाठी एक झुंजार पाऊल पडलं ते माणगावातच.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!