Welcome to Pustakmarket !
Home

छत्रपती शिवाजी महाराज

Book Name : छत्रपती शिवाजी महाराज
Author : कृष्णराव अर्जुन केळूसकर
Publisher : सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रा.लि. (२०१५), पाने – ५२२
ISBN no : -
Category : Historical
Price: 410.RS
Discount Price : 369 RS

Book description

गुरुवर्य श्री. कृष्णाराव अर्जुन केळूसकर यांनी उपलब्ध सर्व साधनांचा साक्षेपाने अभ्यास करून आधुनिक कालखंडातील मराठीतील पहिले शिवचरित्र १९०६ साली लिहिले. त्या काळी व त्यानंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चरित्रे लिहिली गेली. परंतु केळूसकरांनी लिहिलेले शिवचरित्र हे सखोल, विस्तृत व वस्तुनिष्ठ दृष्टीने लिहिले असल्यामुळे ते एकमेवाद्वितीय असेच असून हे चरित्र म्हणजे इतिहासाचा एक अक्षय ठेवा आहे असे म्हणावे लागेल.
१९२१ साली प्रोफेसर एन्. एस्. ताकखाव, विल्सन कॉलेज, मुंबई यांनी या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये The Life of Shivaji Maharaj (Founder of the Maratha Empire) या नावाने भाषांतर केले. इंदूरच्या श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांनी इंग्रजी चरित्रग्रंथाच्या ४000 प्रती विकत घेऊन जगभरातील प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या. त्यामुळे जगातील प्रमुख ग्रंथालयांत आजही छत्रपती शिवरायांच्या चरित्रग्रंथाच्या प्रती उपलब्ध झाल्या आहेत.
सध्या हे इंग्रजी शिवचरित्र दुर्मिळ झाले असल्यामुळे आम्ही ते पुन्हा प्रकाशित करीत आहोत. एखाद्या कलाकृतीची पुनर्निर्मिती केली जाते तेव्हा तिच्या निर्मितीमागे एक वैचारिक अधिष्ठान असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सर्वांगसुंदर चरित्र त्यांच्या थोरवीस शोभावे असेच प्रकाशित झाले पाहिजे. हा विचार घेऊन आम्ही मराठी व त्याचबरोबर इंग्रजी भाषेतील केळूसकरलिखित हे शिवचरित्र सर्वसामान्य वाचक-अभ्यासकांना उपलब्ध करून देत आहोत. गुरुवर्य केळूसकरांनी हे शिवचरित्र लिहून शिवचरित्रकारांपुढे एक मानदंड उभा केला आहे! म्हणूनच केळूसकरांच्या या अलौकिक कार्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्याची आम्ही संधी घेत आहोत. …(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!