Welcome to Pustakmarket !
Home

डॉ. प्रकाश आमटे – आदिवासींच्या जीवनात प्रकाशबीजं रुजवणारा प्रकाशयात्री

Book Name : डॉ. प्रकाश आमटे – आदिवासींच्या जीवनात प्रकाशबीजं रुजवणारा प्रकाशयात्री
Author : दीपा देशमुख
Publisher : मनोविकास प्रकाशन, (२०१९), पाने – ५६
ISBN no : ९७८-९३-८६११८-१५-८
Category : Ideological
Price: 85.RS
Discount Price : 77 RS

Book description

जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, एवढंच काय, पण रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साध्या सुविधाही नव्हत्या, अशा हेमलकशासारख्या अतिशय दुर्गम आदिवासी भागात जाण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांना - बाबा आमटे यांना दिलेल्या शब्दाखातर, आयुष्याचं ध्येय म्हणून घेतला. हेमलकशाच्या आजूबाजूला असलेलं जंगल, जंगलातले विंचू, साप, अस्वल आणि जंगली प्राणी, आदिवासींचं भीषण दारिद्र्य आणि कुपोषण, भाषेचे प्रश्न अशा अनेक अडचणींची मालिकाच डॉ. प्रकाश आमटे यांच्यापुढे होती. तरीही ही दुर्गम वाट स्वीकारत पुढे जाणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांच्या अथक प्रयत्नांमधून आज हेमलकशात शाळा सुरू झाली, हॉस्पिटल उभारलं गेलं, शेती पिकू लागली आणि जे हेमलकसा जगापासून तुटलं होतं, ते आज जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि त्यांच्यावर 'मॅगसेसे’ सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा वर्षाव झाला. मानवतेचा ध्यास घेतलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांना प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. मंदा आमटे यांनी हेमलकशातले आदिवासी आणि तिथले वन्य प्राणी यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. म्हणूनच तर ते ठरतात सर्वार्थानं 'तुमचे आमचे सुपरहिरो!'….(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!