आयआयटीतून केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेऊन आदिवासी चळवळ, सत्याग्रहानंतर होणारा तुरुंगवास, त्यानंतरची बेकारी अशा अनेक चढ उतारांना तोंड देत अच्युत गोडबोले संगणक क्षेत्रात मोठमोठ्या जागतिक कंपन्यांत काम करत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचतात. गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, संगीत, साहित्य, चित्रकला, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांत रस घेत, सखोल अभ्यास करून ते विषय, त्या विषयांचा इतिहास आणि त्या विषयांची मूलतत्त्वं यांच ज्ञान सर्वसामान्यापर्यंत सोप करून अत्यंत रजक भाषेत पोहोचवतात. हे सगळ करण्यासाठी त्या प्रत्येक विषयावरचं भरभरून प्रेम, त्या विषयाबद्दलचं अमाप कुतूहल, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यासाठी अचाट कष्ट करण्याची तयारी, तो विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची अपार असोशी आणि त्यासाठी लागणारी अफाट बुद्धिमत्ता अन् ऊर्जा... हे सगळं येतं कुठून? अच्युत गोडबोले यांचं हेच विलक्षण वेगळेपण त्यांना बनवतं 'तुमचे आमचे सुपरहिरो!’ ….(पुस्तकातून)