Welcome to Pustakmarket !
Home

मराठा समाजाचे ओबीसीकरण आणि जातीअंताचे धोरण

Book Name : मराठा समाजाचे ओबीसीकरण आणि जातीअंताचे धोरण
Author : प्रा. श्रावण देवरे
Publisher : सुगावा प्रकाशन
ISBN no : -
Category : Political
Price: 50.RS
Discount Price : 45 RS

Book description

भारतीय राज्य घटनेप्रमाणे अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागा आहेत. राखीव जागांचा फायदा घेतला तर, आपण खालच्या जातीचे समजले जाऊ असे या उच्चजातींना वाटत असे. पण आता काळ बदलला आहे. बाह्मण, मराठा इ. उच्चजाती आता राखीव जागांची मागणी करीत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? खालच्या 'समजल्या गेलेल्या जाती सवलतीचा फायदा घेऊन आपली प्रगती करीत आहेत. हे उच्चजातींना सहन होत नाही. हेच लोक एका बाजूला जातीवरून सवलती द्यायला विरोध करतात, आर्थिक पायावरच सवलती द्यायला हव्यात असा आग्रह धरतात, जातीवर आधारीत सवलती दिल्यात तर, गुणवत्ता घसरते असे म्हणताता. गरीब ब्राह्मण, मराठा मुलांवर अन्याय होतो, असे एक ना दोन अनेक आरोपकरणे चालूच असते. परंतू दुसऱ्या बाजूला हेच टिकाकार सवर्णांनाही जातीवर आधारीत राखीवजागा द्यायला पाहीजे, अशी मागणी करतात. या त्यांच्या दुटप्पी भुमिकेची उभी आडवी चिरफाड प्रा. श्रावण देवरे यांनी या पुस्तकातील धोमेपोपाबाई प्रवृत्तीवरील (४ थ्या) प्रकरणात केलेली आहे.
आता मराठा समाज स्वतःला ओबीसींच्या यादीत टाकण्याची मागणी करीत आहे. अशी मागणी होताच सर्वांचे डोळे खाडकन उघडले आहेत. आधीच ओबीसींना तुटपुंज्या सवलती मिळतात. क्रिमी लेयरचा प्रश्न धुमसतो आहे.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!