हेरंब कुलकर्णी यांची लेखक व कार्यकर्ता म्हणून प्रागतिक धडपड ही बंडखोर , विद्रोही आणि समाजिक न्यायासाठी लढणारी आहे. अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा त्यांचा कवितासंग्रह अन्याय, सामाजिक विषमता, भ्रष्टाचार, राजकीय तत्वशून्यता , दांभिकता याविषयी पराकोटीचा संताप व्यक्त करणारा आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता व्यवस्थेला जाब विचारते. सामान्य माणसाला विवेकाचे आणि संविधानमूलक सभ्यतेचे परिणाम बहाल करण्यासाठी प्रसवते. सत्याची प्रतिष्ठा प्रस्तापित करणारे उच्चार म्हणून हेरंब यांच्या या कविता समाज माध्यमांतून अनेकांच्या काळजात पोहचल्या आहेतच म्हणूनच त्यांचा हा कवितासंग्रह प्रत्येक विवेकी माणसाने पुन्हा पुन्हा वाचायला हवा.
-रावसाहेब कसबे