आमचे स्नेही इतिहास अभ्यासक प्रा. मंगेश इंगवले यांनी शिवचरित्रावर 'शिवसंस्कार' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांनी मातृभक्ती, पितृभक्ती, बंधुप्रेम, कुटुंब प्रेम याविषयी उत्तम दाखले दिलेले आहेत. याशिवाय शिवरायाच्या ठायी असलेल्या असंख्य गुणवैशिष्ठ्यांची सविस्तर अनमोल माहिती दिलेली आहे. शिवरायांचे प्रशासकीय गुण; त्यामध्ये प्रजेविषयी, सैन्याविषयी, युद्धकौशल्य, दुर्ग प्रशासन, वक्तशीरपणा, साहसी वृत्ती, दूरदर्शीपणा, लोकांची अचूक पारख या सद्गुणांचा ऊहापोह केलेला आहे.