Welcome to Pustakmarket !
Home

गझलजीत

Book Name : गझलजीत
Author : डॉ.वैभवकुमार शिंदे
Publisher : रोअर पब्लिकेशन
ISBN no : 978-93-5593-839-8
Category : Literature
Price: 320.RS
Discount Price : 290 RS

Book description

हिऱ्याचा व्यापारी आपल्या ग्राहकाला एखादा मौल्यवान हिरा ज्या नाजुकतेने, नवलाईने आणि प्रेमाने दाखवतो, त्याच पद्धतीने जगजीत सिंग आपल्या गझलचे शब्द रसिक श्रोत्यांसमोर गाऊन पेश करत असत. जगजीत सिंग यांची गझल ऐकत असताना, ऐकणाऱ्यास त्याचा दिवसभराचा ताणतणाव निघून गेल्यासारखे वाटते, मन प्रसन्न होते. प्रत्येकाला ही गझल म्हणजे जणू आपलीच कहाणी आहे, आपणच जणू गात आहोत की काय? असे वाटावे, इतकी ती श्रोत्यांना भावते. त्यांच्या अद्वितीय गायनशैलीमुळे व आवाजामुळे, सर्वसामान्य रसिक तर सुखावलाच, परंतु या देशातील हिंदी सिनेसंगीत दुनियासुद्धा दणाणून गेली. जगजीत सिंग यांचे आयुष्य असह्य दुःख प्रसंगांनी भरलेले होते. त्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागलेले कणखर निर्णय, अपार मेहनत, अपयशाने न खचता कार्य करीत राहण्याचे कसब व मरणप्राय दुःखातही स्वतःला सावरण्याची हिंमत, वाचकांना प्रेरणादायी ठरतील याचा मला विश्वास आहे. माझ्यासारख्या असंख्य रसिकांची मने जिंकणाऱ्या या कलाकाराला 'जगजीत' हे नाव जसे सार्थ आहे, तसेच आपल्या आगळ्यावेगळ्या गायनशैलीने जगभरातील रसिकांना गझलकडे आकर्षित करून, गझलवर नितांत प्रेम करायला भाग पाडणाऱ्या या कलाकाराला 'गझलजीत' हे नाव देखील तितकेच संयुक्तिक आणि समर्पक वाटते.
(मलपृष्ठावरून )Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!