कविला कधी कधी न लिहीता न बोलता व्यक्त होता येत परंतू हे असं व्यक्त होणं दुःखाच्या पारंबीला घट्ट झोंबलेलं असावं लागतं. कवी अनिल उर्फ राजेंद्र अंबादास इंगळे यांची कविता या अर्थानं थोडी वेगळी आहे. तो सार्वजनिक दुःखाबद्दल बोलत नाही की सार्वजनिक सुखाबद्दलही व्यक्त होत नाही तर ती, व्यक्तीच्या सुखदुःखाभोवती रिंगण घालतांना दिसते. खरं म्हणजे 'एक वादळ शमलं आता... असं म्हणण्याऐवजी कविन दुसऱ्या ज्वलजहाल वादळाची नांदी द्यायला हवी होती... तशीही नांदी अव्यक्तरूपात कदाचित असेलही, परंतू मानवी जीवनाच्या प्रचंड आणि सर्वदूर पसरलेल्या अवकाशाचा कोंभ त्यांच्या कवितेत आता आता अंकुरायला लागला आहे. हे काही कमी नाही. एकुणच कविनं जीवनवादी होण्यासाठीचा अनुभवप्रधान आणि समुहाच्या पुढे पुढे सरकत जाणाऱ्या जीवनरेखा अधिक मर्मज्ञपणे पहायला हव्यात असं मला वाटतं.
-शिवा इंगोले