Welcome to Pustakmarket !
Home

कार्यमग्नता

Book Name : कार्यमग्नता
Author : डॉ.श्रीराम य.गडकर
Publisher : मुक्ता पब्लिकेशन्स
ISBN no : 978-93-81249-39-0
Category : Literature
Price: 999.RS
Discount Price : 899 RS

Book description

कार्यमता हे डॉ. श्रीराम गडकर यांच्या तब्बल २८ वर्षांच्या सेवेतील त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे अभ्यासेतर उपक्रमांचे परिश्रमपूर्वक केलेले अहवालांचे संकलन आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे, वेळच्यावेळी ठेवलेल्या नोंदींचे हे फलित आहे. सेवाकालीन २८ वर्षांची ही दैनंदिनीच आहे. रोजच्या रोज दैनंदिनी लेखनाची सवय असल्यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे. यातून त्यांची महाविद्यालयातील विविध उपक्रमांमधील सक्रियता दिसते. आपण जबाबदारीने, परिश्रमपूर्वक केलेले एखादे काम जितके महत्वाचे असते तितकेच त्या कामाच्या ठेवलेल्या नोंदीही महत्त्वाच्या असतात. अनेकदा केलेले काम खूप मोठे व समाजोपयोगी असते पण नोंदी न ठेवल्यामुळे ते विस्मरणात जाते. डॉ. श्रीटाम गडकर यांनी आपल्या उपक्रमशीलतेला, कार्यक र्तृत्वाला, सेवाभावी वृतीला, स्मरणशक्तीला, संकलनवृत्तीला दिलेली जोड म्हणजे त्यांचे कार्यमगता. हे पुस्तक होय. कदाचित ही नवनिर्मिती नसेलही आणि नाहीच..! ...पण एका प्राध्यापकाने एका महाविद्यालयात केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची अभ्यासेतर उपक्रमांची व ज्ञानाच्या विस्ताराच्या कार्याची ही रोजनिशी आहे. सेवाकालीन कार्याचा लेखाजोखा आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकाने अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, संशोधन, यासोबतच अभ्यासेतर उपक्रम व ज्ञानाच्या विस्ताराचे कार्य कसे करावे याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. इतर प्राध्यापकांसाठी दिशादर्शकही आहे. त्यामुळे हे पुस्तक महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी मैलाचा दगड ठरेल याविषयी शंका नाही.

- डॉ. आनंदा गांगुर्डे



Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!